STORYMIRROR

Monali Kirane

Abstract

3  

Monali Kirane

Abstract

कासव

कासव

1 min
201

वाढत चालली माणसं,त्यांची किंमत झाली कमी.

कॉंक्रीटच्या जंगलात मिळेना माणुसकीची हमी.

सायकल-मोपेड जाऊन आल्या मोठ्या लक्झरी कार,

संवेदनांचे अंकुर पोसतात आशेचे थेंब चार.

वास्तवाच्या विस्तवाचे कशाला उगीच चटके,

आनंदाने जगत राहू बांधून एक जग लटके.

असेच आलो असेच जाणार करणार बदल काय,

क्षुद्र समजून ओढून घेतले कवचात हात नि पाय!


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ

Similar marathi poem from Abstract