STORYMIRROR

Monali Kirane

Tragedy

3  

Monali Kirane

Tragedy

गारठा

गारठा

1 min
174

बाहेरच्या बर्फाची मनावर गोठवणारी चादर

मोकळ्या पडल्या घरट्यावर उदाससा एक थर

पूर्वी होता थंडीला उत्साहाचा वास

फुटलेल्या नाजुक ओठांत भरवत चिमणासा घास

लालचुटूक कानटोपीतून लुकलुकणारे डोळे

बुडून गेल्या शालीमधले भाव एकदम भोळे

आता स्थलांतर करून गेले मोज्यांमधले पाय

तीच थंडी,तीच बंडी करू ह्यांचं काय?



विषय का मूल्यांकन करें
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy