STORYMIRROR

sarika k Aiwale

Tragedy

4  

sarika k Aiwale

Tragedy

तहानलेली नजर त्याची..

तहानलेली नजर त्याची..

1 min
292

नजरेआड गेली होती

काल माझी सावली ती

प्रश्न केला मला तिने

काय होती चुक माझी


अशी कशी माणसं होती

तहानलेली नजरेची ती

बाकी निरर्थक जिवनी

सत्य त्यांची पाशवी वृत्ती


कधी पाहिली नाही आई 

नात्यातली कसली दरी ती

काल परवा सगळ बरोबर

आज अचानक चुक ती


तहाण पाशवी तयांची ती

त्यास कळी ना फुले भावली

हसरी सकाळ प्रसन्न होती

काजळी कुठूनशी ती पसरली


काय सांगू त्या निरागसतेला

विश्वास तिचा खचला होता

भयाच्या काळोखी दाटली

विषारी नजरेची ती बाधा होती


कुठून निष्प्राण जाहला देह

बोलकी बाहुली निश्ब्द होती

नजरेत तिच्या एकच सवाल

कसली तहाणलेली नजर ती


गोठली भावनाची नित्य कोंडी

सलते नजर कसलीशी ती

काय गुन्हा निष्पाप जिवाचा

घात तिचा ,तहान त्याची ती


अस्ताव्यस्त झाले जीवन

अयुष्यात रंगांधळाली ती

काळ्या बाहुल्या असती

माणसं खरचं रंगीत असती


नियमच्या धागयात बांधील

जीवन नित्य ती ही जगती

इतरांच्या चुकीच्या शिक्षाही

निष्पाप जीव का भोगती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy