कुंनभटाचं जीण नको - नको झालं
कुंनभटाचं जीण नको - नको झालं
किडुक - मिडूक गहाण ठेवून
मला महागांच खत बी आणल
कसलं काय अन फटक्यात पाय
औंदाबी लगीन अवघडच हाय
रात- पाहट जनरागत राबलो
कोरड्या कधी ओल्या दुष्काळानं
सरकार व्यापाऱ्यागत पावसानं घेरलं
खर्च वगळता हाती काय उरलं ?
चोर भामट्यानी बँक लुटल्या
आम्ही खेट्या घालून वहाणा झिजवून
पदरी मात्र निराशाच आली सदा नी कदा
कुंनभटाचं जीण नको - नको झालं