हूकलेले पाऊल
हूकलेले पाऊल
माझे लक्ष्य न वेधता,
का गं तुझे पाऊल मंदावते हळू- हळू.
माझे लक्ष्य जेव्हां वेधते,
का गं तुझे पाऊल होते गतिमान हळू- हळू.
जेव्हा नजरेला नजर वेधते,
का गं तु नागमोडी पळ काढते.
तुझ्या कृति ने मला अनुभुती होते,
जसी नागिन वनामध्ये सळ्सळते.
तुझा या गुप्त संकेताने,
मनातले व्दंद उफाळ्या मारते हळू- हळू.
तुझा मनाची ही प्रेम ओढ,
कळु लागली बर मला हळु- हळु.
चंचल मन बेभान होऊ लगले हळू- हळू,
सैरे-वैरे पळु लागले हळू- हळू.
माझी ही अवस्था पाहूनी,
मित्रगण ही कुतूहल करु लागले.
तुझा माझा मित्र-मैत्रिणी मध्ये,
आपल्या निर्मळ प्रेमाची चाहुल लागली हळू- हळू.
मला हे कळलेच नाही कां,
सांग तू, सांग तू. हळू- हळू.
तुझ्या माझ्या प्रेमाचे हे युध्य,
किती काळ चालणार हळू- हळू.
तुझा नांदातं गुंतलो असा,
कर्त्यव्याचा ढिला पडला कसा.
मी कसा तिथेच गुरफटुन उभा राहिलो,
प्रेम आणि तारुणच्या भाडंणात फसलो.
निर्णय घेता-घेता,
वेळ सरकु लागला हळू- हळू.
तु प्रेमाचा हात सरसावला ,
आणी थकले तुझे ते टपोर डोळे.
वाट बघता –बघता निर्मळ प्रेमाची,
मी पुढे करिन हात कधीतरि हळू- हळू.
वेळ निघुन गेली प्रकाशाच्या वेगाने,
आणि प्रेमसंधी निसटली हळू- हळू.
गतिमान काळाचा विचार करीता,
प्रेमाच्या ओढ्यातुन उडी घेतली भारि मनाने,
आणि, तु पुढे निघुन गेली, हळू- हळू.

