प्रेमाचा झरा.
प्रेमाचा झरा.
प्रेमाचा झरा.
तुझ्या मनातही होती तीच गोष्ट,
तुझे डोळे सांगत होते ते स्पष्ट.
माझ्या मनातही होती तीच गोष्ट,
माझ्या आचरनात दिसत होते स्पष्ट.
तू सांगण्याचे नाही केले धाडस कधी,
आनी मी पण चुकलो होतो त्याक्षणी.
म्हणूनच तुझ्या प्रेमाला मुकलो यावेळी,
घोडचूक झाली माझ्या कडून त्याकाळी.
तुझ्या-माझ्या चुकीची चुकवतो किंमत याजन्मी,
मन मोकळे करावे वाटते तुला भेटून कधीतरी.
पण सर्वमार्ग कायमचे झाले बंद माझे याजन्मी,
म्हणून काही प्रेमाचे झरे अजून बरे आटले नाही.
तुझी पण अवस्था माझ्या सारखीच असावी,
भेटू कधीतरी जर तुला-मला मिळाली संधी.
मला माहिती नाही तुझा सध्या ठाव-ठिकाना,
तुला पण माहिती नसेलच कुठे माझा ठिकाना.
कठीण झाले तुझी ती आकृती आठवणे,
बरेच घडवले असेल बदल या प्रकृतीने.
संधी मिळाली तर उठतील ती जुने तरंगे,
याच आशेने जगत आहो पाहून तुझे स्वप्ने.
