तुझी लावणी
तुझी लावणी
तुझी लावणी
लाल-लाल लुगड्यात आणी सजलेली वेणी,
बघतो जेव्हा मी तुझी मनमोहणी लावणी.
चुकीचा नव्हता माझा होकार त्याच क्षणी,
झाल्या नंतर तुझी अर्धांगीणीसाठी पाहणी.
पाहणीच्या वेळी दिसली मला तू मृगनयणी,
लग्नाच्या आधीच वाटली खरी तू सहचारणी.
गोड-गोड वाटली होती तुझी ऐकून ती वाणी,
तुझ्या आवाजाने झालो होतो मी पानी-पानी.
तुझे असाधारण रूपसौंदर्य आणी वाणी,
माझ्यासाठी एकमात्र खरचं अमरकहाणी.
उतरत्या वयातपण प्रेमळ तुझी ती वाणी,
सारखी बघत राहावीशी वाटते ती लावणी.
लागणाचा आधी वाटत होती तु मृगनयनी,
आता दिसते खरी माझी तु शीतलचंद्रमुखी.
बघुन तुझे रूप झालो मी आनंदी व सुखी,
तूच असावी पुढच्या जन्मी माझी गृहीणी.
जीवणात कितीही संकट जरी ओढली,
तरी होत नाही कधीच क्षणभरही दुखी.
मी होतो हळवा ऐकुन तुझी मधूरवाणी,
रमुन जातो घरी आठवउन तूझी लावणी.

