STORYMIRROR

Arun Gode

Abstract

4  

Arun Gode

Abstract

भारतीय संविधान.

भारतीय संविधान.

1 min
13

                भारतीय संविधान. 

भूमीवासीयांनसाठी एकच सत्य विधान,

सर्व ग्रंथात नक्कीच सर्वश्रेष्ठ संविधान.  

संविधानच देते नागरिकाला उचित सन्मान,

आदरच असते यशस्वी जीवणाचे खरे कारण.   


विविधतेमध्ये जपायची असेल खरी एकता,

असावी स्वधर्मापेक्षा संविधानाचीच श्रेष्ठता.  

भूमीच्या कोण्या-कोपऱ्यात नांदेल खरी शांतता,

मगच देशात सर्वत्र दिसेल आर्थिक संपन्नता.

 

समृध्द देशात प्रत्येक नागरिकाला वाटेल अभिमान,

जगाच्या पाठीवर तिरंग्याचे असणारं सर्वोच्च स्थान.  

या भूमीत जन्माला आल्याचा त्याला असेल अभिमान,

प्रत्येक देशवाशी भूमीला असेल कृतज्ञ व करणार नमन.  





भारतीय संविधानाची उद्देशिका देते नागरिकांना,

सामाजिक,आर्थिक व राजनैतिक न्यायचे आश्वासन. 

विचार अभिव्यक्ति ,विश्वास,श्रद्धा आणी उपासना,

यांचे स्वातंत्र्य आणी दर्जा व संधी समानतेचे वचन.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract