माझी सहाचारणी.
माझी सहाचारणी.
माझी सहाचारणी.
तरुणाईत बघितले मी एक स्वप्न मनी,
कसी असावी संसारात माझी सहचारणी.
सरळ तीचे वागणे आणी असावी बहुगुणी,
मला ती समजुन घेईल अशीच अर्धांगीणी.
नशिबाने पदरी पडेलच अशी एकनंबरी सुंदरी,
ती असेल नम्र आणी गालावर तीच्या खळी.
खूपच खोल असावी तीच्या गालावरची खळी,
खळीत डुबून निघन्याची येणारच नाही पाळी.
जन्मोजमाचा साथ तीचाच असावा नाही इच्छा माझी,
याच जन्मी तीने करावे निरागस प्रेम अपार माझ्याशी.
तीचे स्वप्नपूर्ण करण्याची मनाची तयारी आहेच माझी,
फक्त आदर्श सहचारणीचा धर्म पाळावा तीने माझ्याशी.
आदर्श संसार जपणारी असावी माझी प्रियशी,
एकनिष्ठ असावी ती अंतपर्यंत माझ्या देहाशी.
संघर्षात साथ देणारीच असावी ती मनमोकळी,
शेवटी एकत्र स्वर्गवाशी व्हावे अशी इच्छा माझी.
