धुळीवदंन व प्रीत.
धुळीवदंन व प्रीत.
धुळीवदंन व प्रीत,
लाल-लाल,गुलाबी-गुलाबी गोड गालावर,
हळदीचा चमकता पिवळा-पिवळा डाग.
होळी सोबत धुळीवदंन आणी मास फाग,
मनाला लागली तुझ्या प्रेमाची तीव्र आग.
विविध रंग तुझ्या चेहऱ्यवर उठून दिसतात,
हनोटी आणी ओठामधील तो गर्द काळा तीळ.
मनात होते सारखी तरुण प्रेमाची मळ-मळ,
मी त्याला कसे आवारू बांधून फासाचा गळ.
कसी आहे ही प्रीतीची न कळात मळ-मळ?
जमयांच नाही मला त्याची करणे हळ-गळ.
माझ्या मनाची होत आहे सारखी पळ-पळ,
मग केव्हा येणार तीच गुलाबी भेटीची वेळ.
नेहमीच येते हिवाळा ,पावसाळा व उन्हाळा,
कोणत्या हिवाळ्यात लावणार तू जिव्हाळा.
थांबत नसते कधीच भरती-ओहोटी व काळ,
कधीतरी मिळणार कां मला प्रतिक्षेचे फळ?
करू या काही चमत्कार फुलवून प्रीतीचे जाळे !
जगाला दाखवु आपल्या प्रेमाचे रूप आगळे-वेगळे.
आधीपण होते व नंतरपण असणार प्रेमी जोडपे,
समाजासाठी आदर्श म्हणून राहील आपले जोडपे.

