माझे जन्मस्थान .
माझे जन्मस्थान .
माझे जन्मस्थान
वर्धा नदीच्या काठावर एक स्थान,
तेच आहे माझे पावन जन्मस्थान.
रेल्वे पुलाचे या नदीवरच ठिकाण,
गांवकऱ्यांनी पुलगांव केले नामकरण.
सातपुडा पर्वत रांगेत आहे तीचे उगमस्थान,
मध्य परदेशातून महाराष्ट्रात तीचे आगमान.
धाम व वर्धा नदिचे गांवापूर्वीच होते मिलन,
माझ्याच गांवी वाढते नदीपात्राचे आकारमान.
माझ्याच गांवी तीला निघतात पंचप्रवाह,
पंचधारा हे गांवाचे खूपच रमणीय स्थान.
पंचप्रवाहाचे होते खोल कुंडातमध्ये मिलन,
तरी कुंड कधीच वाहत नाही तुडुंब भरून.
पावसाळ्यातच अदृश्य होतात पाचही प्रवाह,
आणी पुरामुळेच दुर्लभ होते कुंडाचे दर्शन.
पंचधारेच्या नदीकिनाऱ्यावर अनेक मंदीर,
स्थानीय भक्तासाठी तेच आहे पावनस्थान.
हिंदू रीती-रिवाजाने तीथे होते अंतिम संस्कार,
मानवमुक्तीचे तेच प्रियव्यक्तिसाठी अंतिमस्थान.
धामनदी किनाऱ्यावर दोन ऐतिहासिक मुख्यस्थान,
पवनार आणी सेवाग्राम हीच ती महत्वाचे ठिकाण.
विनोबा भावे यांनी चालविले भूदान आंदोलन,
तीथेच आहे सर्वोदय साहित्याचे प्रमुखस्थान.
त्यांचे सर्वोदयसाहित्य मानवासाठी खरे दर्शन,
सेवाग्रामचे स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान.
बापूने तीथुनच चालवले सतरावर्ष राजकारण,
स्वातंत्र्य चळवळीचे होते ते मुख्य केंद्रस्थान.
इतिहासात सेवाग्राम आश्रमाचे राजकीय योगदान,
बापुच्या जीवनोपयोगी अनेक वस्तूंचे तीथेच जतन.
पर्यटकांनसाठी त्या वस्तु आहेत मोठ्या मौल्यवान,
दोन्ही ऐतिहासिक जागे जवळच माझे जन्मस्थान.
देशाच्या लष्करी दारू–गोळ्याचे ते प्रमुख केंद्रस्थान,
लढाईच्यावेळी युध्दसामुग्रीचे तीथुनच स्थानांतरण.
