STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Tragedy

3  

Sakharam Aachrekar

Tragedy

निरोप

निरोप

1 min
193

द्यावा निरोप आता, जाते रित्याच हाती

नाही खरी इथे हो, मज कोणतीच नाती 


कोणी इथे पहा तो, देहा हपापलेला

विश्वात या विखारी, सांगा जगेल का ती? 


हरवून दूर जाता, स्त्री मुग्धता अशी ही 

नाही उरेल काही, जन्मांत हाय साती


घे अंबरा तिला तू बाहूंत आज दोन्ही 

भूमीस हाय इथल्या, ही कुंपणेच खाती 


का भ्रष्ट वासनेची, काया शिकार होते

स्वप्ने उरातली त्या, संगे जळून जाती 


सोडून दे अता तू, ही क्षणिक देह तृष्णा 

या काचखेळण्यांची, आहे अखेर माती


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy