STORYMIRROR

swati Balurkar " sakhi "

Tragedy

3  

swati Balurkar " sakhi "

Tragedy

निराळी पानगळ

निराळी पानगळ

1 min
281

कसा गळतोय एक एक दिवस

पानगळीत पाने गळावी तशी!

आज, काल अन् परवा,

सकाळ दुपार अन् संध्याकाळ!

पोटासाठी खातोय की जगण्यासाठी?

जिभेसाठी खातोय की जिवंत राहण्यासाठी?

कसे गळताय दिवस असेच चेहर्‍याविना

बेरंग अन् उदास, फसवे अन् थकवणारे कधी

घरातल्या त्याच, त्याच, त्याच दिनचर्येचा 

कंटाळवाणा आलाप गाताना मनही उदास!

कशी पानगळ लागलीय महिन्यांची अन्

सणावारांचीही, हौसेमौजेची लॉकडाऊनमधे!

पानं गळल्यागत हल्ली 

दिवसांची, तारखाची गळती होतेय!

असहाय सगळेच शरण आलेले, 

वा रे करोना तुझी हुकुमशाही!

पानांप्रमाणे गळती झाली जीवनांची!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy