STORYMIRROR

swati Balurkar " sakhi "

Tragedy

3  

swati Balurkar " sakhi "

Tragedy

कोरी पाटी

कोरी पाटी

1 min
138

सांग ना रे ईश्वरा

कोर्‍या या पाटीवर

लिहू मी कोणते अक्षर?

लिहिलेला अध्याय अख्खा


पुसुन टाकलास तू क्षणभर

आता कोरी पाटी, घेवून हाती

मी सुरू करू का नवा अध्याय?

उद्देश्य अन् जीवनाची दिशा


तूच आहेस ना ठरवणार?

भरलेली पाटी माझी सुरेख. .

हिसकावून घेतलीस अन दिलीस

ही कोरी पाटी पुन्हा. .


नशीबाचा नवीन अध्याय रेखाटण्यासाठीच ना?

हे ईश्वरा. . तुझी आज्ञा, कोरी पाटी

माझ्यासाठी . . . शिरसावंद्य !


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy