STORYMIRROR

swati Balurkar " sakhi "

Inspirational

4  

swati Balurkar " sakhi "

Inspirational

स्त्री उमगते का कुणा?

स्त्री उमगते का कुणा?

1 min
312

ती उमगते

कधी कुणा?

ती हसते 

ती रडते

ती अडखळते अन

चालत जाते पुन्हा!


ती कोमल 

ती नाजूक 

ती सुंदर 

ती चाबुक

ती कणखरही कधी

जगाशी लढते पुन्हा!


ती अशी

ती तशी

ती जशी पण

ती कशी

रहस्य बनते

ती उमगते कुणा?


ती धरती

ती माता

ती भगिनी

ती त्राता

कधी खंबीर अन

कमकुवतच कधी

ती उमगते कुणा?



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational