मलाही थोडं जगू द्या...
मलाही थोडं जगू द्या...
दोन दिवसाचे आयुष्य
ते आनंदाने भोगू द्या..
जीव माझ्यातही आहे
मलाही थोडं जगू द्या..
माझे असे काय चुकले
की तुम्ही गर्भहत्या करता..?
मिळतो कोणता आनंद
का मला जन्मापूर्वी मारता..?
मुलं जसं बघतात जग
तसं मुलींनाही बघू द्या..
जीव माझ्यातही आहे
मलाही थोडं जगू द्या..
प्रेम-त्याग-समर्पणाचा
गंध आम्ही पसरवतो..
भाऊच्या हाती राखीचा
प्रेमधागा आम्हीच बांधतो..
अंतर्मनी असलेला तुमचा
स्वार्थ जरा निघू द्या..
जीव माझ्यातही आहे
मलाही थोडं जगू द्या..
"वंशाचा दिवा" म्हणून
मुलगाच हवा तुम्हांला..
मग आई-बहीण- बायको-सून
कशी मिळेल तुमच्या वंशाला?
राहू नका निद्रेत तुम्ही
मनाला आता जागू द्या..
जीव माझ्यातही आहे
मलाही थोडं जगू द्या..
