STORYMIRROR

Priti Yawalikar

Tragedy

3  

Priti Yawalikar

Tragedy

शमन शांततेचे

शमन शांततेचे

1 min
27.3K


हृदयी वेदनांचा कहर

विस्तवाचा आकांत

पेटवुन या स्वचितेला

पुन्हा मी-मी ज्वलंत


धकधकत्या सरणावर

कितीदा सोडिले प्राण

हरवुन नियतीला मिळेल

का पुन्हा-पुन्हा जिवनदान ?


लेखणिच्या चिंगारीने

शांतता आत्म्याला

अंगी तांडव रक्तांच्या

एक-एक चिरकांड्यांचा

.

.

तरीही शांत शांत

शांत ...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy