STORYMIRROR

Priti Yawalikar

Tragedy

3  

Priti Yawalikar

Tragedy

कोठडीत हृदयाच्या...

कोठडीत हृदयाच्या...

1 min
42

लेखणीची टोके तोडून करावा म्हणते गुन्हा अखेरचा 

या घुसमटलेल्या भावनांची किंमत न कळण्याचा


ओसंडावा आत्मविश्वास जाऊ द्यावा तडा हृदयाचा 

करावा म्हणते पंचनामा अश्रूंनी भरलेल्या कवितेचा


व्हावे हिस्सा स्वतःच उभे होऊन हृदयाच्या कोठडीचा 

देऊन कवितेची शपथ दाखवावा मग पुरावा आत्म्याचा


झाली फाशी काळजातून उमटणाऱ्या शब्दाला

व्वा... चार लोक जमा कवितेचे रडू पुसायला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy