स्वातंत्र्य
स्वातंत्र्य
1 min
131
हे कस आयुष्य ए राव..?
पिंजऱ्यात ठेवल तर जग पाहायला नाही मिळणार,
मी यांना स्वातंत्र्य दिल तर बाहेरच जग त्यांना चिरडुन टाकणार.
घुसमटत जगताना किती तो श्वास त्यांचा कोंडल्या जात असेल बर,
बंदिस्त केलेल्या या पिंजऱ्यात जगताना मला नाही पाहवल्या जाणार हह्ह्हह बाबा.
आईइइइइइइइइइ दार लाव ना......!
हळुच बाबा बोल्लेत,
आज ना आपण यांना घरातच मायेच आभाळ करुन उडायला शिकवणार.
ते मुक्त आभाळात उंच भरारी घेणार त्यांना स्वातंत्र्य मिळणार...
हे एकुन आनंद पुन्हा गगनात मावेनासा झाला आणि कवितेच्या सुंदर ओळी ओठावर आल्यात ....!
नाही मागत रे आभाळ मी
मायेने जरा कवेत घे,
जिंकवुन दाखविन जग सारे
हाती-हात धरुनी तु जरा
धिर दे तु जरा धिर दे...!
