बाबा
बाबा
1 min
14.1K
इवलिशी लाडकी तुमची
परिराणी
आठवता एका क्षणी आलं
डोळ्यात पाणी
सर्व विषयावर लिहायची
सवय झाली
कशी हो बाबा फक्त
तुमच्यासाठीच लिहायचे
विसरुन गेली
तुम्हीच दिली हाती लेखणी
कोणते शब्द मांडू
तुमच्यासाठी हे ही सुचे ना
माझ्या मनी
शिकवलं जेव्हा तुम्ही खुप
आनंद झाला
चिउ ये ,काउ ये ,दाना खा
पाणी पी आणि भुर्र्कन
उडुन जा
असच होइल का हो बाबा
क्षण एक येइल असा
कदाचित अर्ध्यावरच नाहि
ना थांबणार हा प्रवास ?
बस आणखी थोडे दिवस दुर
राहायचे आहे आपल्याला
प्रत्येक सुखात-दुखात ,यशात अन
अपयशात तुम्हीच हवे
आहात मला,
कुठेही नाही जानार बाबा मी ह्ह्ह..
सुरकुतलेला तुमचा हात माझ्या
हातात घेइल आनि उद्याच्या सोबत
जगण्याची आशा मी फक्त तुमच्या
डोळ्यात पाहिल ..!