STORYMIRROR

savita Dhakne

Tragedy

3  

savita Dhakne

Tragedy

पाऊस

पाऊस

1 min
28.3K


पाऊस


येरे येरे पावसा,

का रे तू रुसला,

ढगांच्या पलिकडे,

जाऊन का बसला.


अरे अरे मेघराजा,

नको रे असा रुसू,

बळीराजाच्या नेत्री,

दाटलेत बघ आसू.


तुझ्या प्रतिक्षेत सोसल्या,

कडक उन्हाच्या झळा,

गरीब शेतक-यांचा तुला,

कधी रे येईल कणवळा.


जुननंतर सरतोय जुलै,

नाही अजून पेरणी,

पावसाच्या थेंबासाठी,

आसुसली रे धरणी.


लाखो शेतक-यांनी,

धरलीय पंढरीची वाट,

खुप पाऊस पाडण्याचा,

विठूरायाला धरलाय घाट.


स्वार्थापायी माणसाने,

तोडली अनेक झाडी,

कोपला निसर्ग सारा,

पावसाने मारली दडी.


चूक उमगून माणसाने,

केले आता वृक्षारोपन,

नियमित पाणी देऊन,

करीन झाडाचे संगोपन.


बस झाले रे पावसा,

नको पाहू आता अंत,

बरसू दे पर्ज्यन्यधारा,

कर वसुंधरेला शांत.


तुझ्या येण्यानं पावसा,

खुलून जाईल आसमंत,

गरीब बळीराजा माझा,

धनधान्यानं होई श्रीमंत.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy