STORYMIRROR

savita Dhakne

Others

3  

savita Dhakne

Others

नातं मैत्रीचं

नातं मैत्रीचं

1 min
891

नकळत जुळती स्नेहबंध,

निर्माण होई अनोखी मैत्री,

जुडतो जन्माचा ऋणानुबंध,

जिथे वसे विश्वासाची खात्री.


मैत्रीत नसते बंधन,

जन्म,वय व शिक्षणाचे,

सहवास, स्नेहाने जुळती,

अनोखे नाते मनामनाचे.


मैत्रीत असते देवानघेवान,

आनंद अन सुख दुःखाची,

प्रिय मित्राची छोटीशी भेट,

भासे अनमोल अन लाखाची.


भासे मित्राचा सहवास,

लख्ख लख्ख सूर्यप्रकाश,

देऊन सल्ला दावती सन्मार्ग,

होई मैत्रीतून जीवनविकास.


मैत्रीत नसतो भेदभाव,

लहानमोठा,गरीब श्रीमंत,

मदतीला सदा घेती धाव,

असेल कुणी मित्र गरजवंत.


मैत्री असे छानसं रोपटं,

प्रेम, विश्वासाचे देऊ सिंचन,

होई मैत्रीचा मोठा वटवृक्ष,

आजन्म मैत्रीचे देऊ वचन.


Rate this content
Log in