STORYMIRROR

savita Dhakne

Inspirational Others

3  

savita Dhakne

Inspirational Others

शौर्य - साहस

शौर्य - साहस

1 min
435

क्रांतिकारकांची स्फुर्तिदेवता राणी लक्ष्मीबाई,

धन्य ते दांपत्य मोरोपंत अन भागीरथीबाई,

कार्तिक वद्य 14 शके 1757 रोजी जन्मली,

शूर, हुशार ,देखणी कन्या मनुताई.


बालपणी गेली आई सोसला मातृवियोग,

ब्रह्मवार्ता पेशवे वाड्यात केले युद्धकलेचे प्रयोग,

लेखनवाचन शिकून केली मोडी अक्षर ओळख,

वयाच्या सातव्या वर्षी जुळला नेवळकरांशी विवाहयोग.


बनल्या मनुताई नंतर राणी लक्ष्मीबाई,

पुत्ररत्नास जन्म देऊन बनल्या आई,

तीन महिन्यातच काळाने पुत्रावर घातली झडप,

पुत्रशोकातच लक्ष्मीबाईचे पतीछत्रही जाई.


सर्व बाजुने दुःखाने लक्ष्मीबाईला दिली दस्तक,

खचून कुणापुढे टेकले नाही मस्तक,

रणरागीणी लक्ष्मीबाईने हाती घेतली तलवार,

गादीला वारस दामोदररावास घेतले दत्तक.


इंग्रजांनी प्रसिद्ध केली एक राजघोषणा,

योजिले खालसा करु झाशीच्या संस्थाना,

बोलल्या राणी 'मेरी झाशी नही दुंगी',

चवताळलेल्या वाघीनीने धमकावले इंग्रजांना.


1857च्या उठावात होऊन सहभागी,

इंग्रजी सत्तेची झाशी संस्थानातून केली रवानगी,

झाशीचे रक्षण करण्या राणी झाली सज्ज,

झाशी कडे पाहण्याचीही नव्हती परवानगी.


1858 मध्ये इंग्रजांनी झाशीवर केला हल्ला,

मोठ्या संकटात सापडला राणीचा बालेकिल्ला,

शरणागती न पत्करता तटावर उभ्या राहील्या,

झाशीच्या तोफा शत्रुची दाणादाण उडवू लागल्या.


होऊन स्वार घोड्यावर घेतले दामोदरला पाठीशी,

'जय शंकर' चा जयघोष करुन लढल्या शत्रुशी,

विजेच्या चपळाईने फिरवली समशेर,

काल्पीच्या झुंजीत शौर्याने लढल्या इंग्रजाशी.


सर ह्यू रोज ग्वाल्हेरवर भिडला आवेशात,

मंदार,काशीसह लक्ष्मीबाई लढल्या पुरुषी वेशात,

राणीच्या अभूतपुर्व शौर्यानै गोरे झाले हताश,

सगळीकडून ग्वाल्हेरवर आले चालून त्वेषात.


घनघोर लढाईत आडवा फुलबागेचा ओढा,

राणीकडे नव्हता नेहमीचा 'राजरत्न' घोडा,

लक्ष्मीबाई त्वेषाने इंग्रजांवर उसळल्या,

मात्र शत्रुच्या हल्ल्याने घोड्यावरुन कोसळल्या.


स्वातंत्र्य वेदीवरच केले प्राणाचे बलिदान,

झाशीचे रक्षण करता करता दिले प्राण,

राणी लक्ष्मीबाई होत्या मर्दानी मूर्त महाकाली,

पराक्रमाची अन शौर्याची ज्योत झाशीवाली.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational