STORYMIRROR

savita Dhakne

Others

4  

savita Dhakne

Others

प्रवास

प्रवास

1 min
335

एकटीच चालते मी,

खडतर हा प्रवास,

परी धैर्य असे उरी,

घेण्या यशाचा सुवास.


कधी धडपडले मी,

पण ढासळले नाही,

मज आत्मविश्वास हा,

सदा मनी उभा राही.


कास प्रयत्नांची अशी,

घट्ट जीवनी धरीली,

येता संकटे वाटेत,

मीच ते दूर सारीली.


माझ्या जीवन प्रवासी,

नाना प्रलोभने आली,

मज संस्कारी मनाने,

सदा दुर्लक्षीत केली.


मम आईने मजला,

दिली निरंतर साथ,

तव भक्कम आधारे,

केली दुखावर मात.


आज माझ्या प्रवासात,

फळे यशाची चाखते,

सकलांचे आशीर्वाद,

मनी सदैव राखते.


Rate this content
Log in