STORYMIRROR

savita Dhakne

Tragedy

3  

savita Dhakne

Tragedy

दुष्काळ एक मोठी समस्या

दुष्काळ एक मोठी समस्या

1 min
346

कसा भयाण दुष्काळ,

नसे घोटभर पाणी,

मुक्या जीवा नसे चारा,

होई सारे दीनवाणी.


नद्या,नाले,पाणवठे,

जलस्रोत हे आटले,

कसे जीवन जगावे,

मन चिंतेने दाटले.


पिके गेली करपुनी,

नसे धनधान्य घरी,

कसे पोसावे कुटूंब,

सल बळीराजा उरी.


कर्ज घेऊनी कृषिक, 

झाला तो कर्जबाजारी,

ऋण फेडता जाहली,

पोशींद्याची हो बेजारी.


झळा सोसूनी दुष्काळी,

पडे घशाला कोरड,

फास घेई शेतकरी,

होई गावात ओरड.


करी शासन मदत,

त्याच्या गरीब पोरांना,

देई कोण चारापाणी,

गोठ्यातील त्या गुरांना.


असे दुष्काळी सावट,

आले तुझ्याच चुकीने,

नको तोडू वृक्षवल्ली,

वाग जरासा नेकीने.


ऐक जरा तू माणसा,

झाडे लावुन जगव,

पडे पाऊस जोराचा,

तुझी तहान भागव.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy