STORYMIRROR

savita Dhakne

Romance

3  

savita Dhakne

Romance

ओठावरील तीळ

ओठावरील तीळ

1 min
482

करी सैरभैर मनास माझ्या,

सखे तुज ओठावरील तीळ,

ये ना समीप अशी तू गं,

प्रित माझी ही घाली शीळ.


गुलाबपाकळीसम अधर हे,

सुंदर,रसरसीत अन गुलाबी,

ओसंडती वदनी सौंदर्यधारा,

नयन भासती मजला शराबी.


मुखकमल पाहता तुझे,

औष्ठतीळ मम लक्ष वेधी,

गजगामिनीसम लावण्या,

येशील कवेत माझ्या कधी.


लालबूंद ओठावरील तीळ,

हळूच मजला इशारा करी,

वाटे मनास चुंबावे तुजला,

हिच कामना वसे सदा उरी.


सखे तुझे सारे बहाणे गं,

ठाऊक आहेत हं मजला,

अलगत दाबूनी तीळ दंती,

सदाच खुणावतेस गं मला.


सोडूनी सारे पाश सखे,

मिठीत तुला ग घेणार,

तीळवासी अधरा चुंबूनी,

प्रेमडोही आहे गं डुंबणार.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance