STORYMIRROR

Jyoti gosavi

Romance

3  

Jyoti gosavi

Romance

विरहात प्रेम

विरहात प्रेम

1 min
165

मेघ आभाळी दाटले

मेघ डोळ्यात दाटले 

दोघेही बरसले 

चिंबचिंब


एकाचं देणं प्रेमाचं

एक लेणं विरहाचं

दोघांचंही प्रेम

अमोलच


एकाच्या प्रेमात 

विरघळली धरणी 

एकाच्या विरहात 

ती लागली झुरणी

दोघांचीही अशी करणी


एकाने केली दैना

एकाच्या विरहात 

झुरली मैना

इश्काचा हा ऐना

लई न्यारा


विरहात दाटे प्रेम

प्रेमात चढते धुंदी 

परी जीव बंदी 

नियतीच्या दारी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance