पावसातं कवीच्या कविता...
पावसातं कवीच्या कविता...
टिप टिप थेंबांचा आवाज सुरू होतो
पाऊस येण्याआधी कवीला चाहूल देतो.
शब्द मगं कवीच्या अंगणभर नाचू लागतातं
पावसातं कवीच्या कविता मोरपिसासारख्या फुलू लागतातं..
टिपटिप थेंबांची रिमझिम हळू चं सुरू होते
सरसर करतं सर अगदी धावून चं येते.
फुले, वेली सरींमध्ये चिंब भिजू लागतातं,
पावसातं कवीच्या कविता मोरपिसासारख्या फुलू लागतातं...
हिरवाईचा शालू नेसून आसमंत नव्याने बहरतो
छेडितं गारवा गाणी पावसाची गातो.
धुंद या वातावरणात पक्षी ही गाऊ लागतातं,
पावसातं कवीच्या कविता मोरपिसासारख्या फुलू लागतातं..

