अजातशत्रू
अजातशत्रू
अजातशत्रू म्हणूनी आहे
तुझे नाव ख्यात जगतात
दिला शब्द नित पाळण्यात
अससी सर्वमुखी प्रख्यात
धावूनी जासी रात्री अपरात्री
आजा-यांना नित्यचि जपसी
आबाल वृद्धांसाठी झटसी
कामाला कधी ना कंटाळसी
मैत्रबंधने आपुली जमली
आईबाबांच्या आजारामधे
रान जीवाचे केलेस सख्या
फे-या मारुनी हाँस्पिटलमधे
तुझ्यामुळेच त्यांना मिळाले
अनमोल असे जीवदान
साथ देशील का जीवनात?
प्रश्न पुसते जरी मी सान
साथ देईन तुला कार्यामधे
वचन दिधले तुज प्रिया
वाट बघते उत्तराची मी
आतुरतेने प्रिय सख्या

