Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

savita Dhakne

Others

3  

savita Dhakne

Others

भय - सरली ती रात्र

भय - सरली ती रात्र

1 min
277


भयरस


सरली ती रात्र


अमावस्येची होती रात,

अन चुकली माझी गाडी,

काळाकुट्ट पडला अंधार,

अन घनदाट होती झाडी.


सोबतीला नव्हते कुणीच,

एकटीच लागले चालू,

घनदाट जंगलात असती,

वाघ,लांडगे अन भालू.


जराशी सरली वाट अन,

कानी पडली डरकाळी,

धस्स झाले पोटात माझ्या,

माझ्यासाठी ती रात्र काळी.


अचानक झुडपा आडून,

खडखड आवाज आला,

खुपच घाबरुन पाहीले तर,

समोर वाघ उभा ठाकला.


भयानक वाघ पाहून,

झाले मी घामाघूम,

काय करावे तेच कळेना,

मग जोरात ठोकली धूम.


पळताना पाहून मला,

वाघाने मारली झडप,

अंधारात धावत जाऊन,

झुडपात झाले मी गडप.


निसटून वाघाच्या तावडीतून,

झाडाझुडपात बसले दडून,

सावज निसटल्याने वाघाने,

फोडली डरकाळी खडबडून.


घाबरुन झाले गर्भगळीत,

ह्रदयाची धडधड होईना शांत,

डोळ्यासमोर दिसले मरण,

वाटे आला जीवनाचा अंत.


Rate this content
Log in