STORYMIRROR

savita Dhakne

Romance

3  

savita Dhakne

Romance

सख्या रे

सख्या रे

1 min
341

अवचित भेटलास तू,

मज एकदा कातरवेळी,

चोरलेस मन माझे,

आठवतोस वेळोवेळी.


असा कसा भेटलास,

अन गायब झालास,

मनात काहूर किती ते

सोडून नाही ना गेलास.


प्रेम म्हणजे काय,

ठावे न मजला,

असाच हा इमला,

प्रीतीचा मनी सजला.


भेटशील कधी सख्या,

मनी एकच आस,

हृदयी तुझ्याचसाठी,

कप्पा बनवलाय खास.


भेटशील तेव्हा सजना,

व्हायचय मला व्यक्त,

घेशील ना रे समजून,

हृदयीच्या भावना अव्यक्त.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance