पावस स्फ़ुर्ति
पावस स्फ़ुर्ति
पावस जेंव्हा पडतो रानात
रुजतो तो मातीच्या कणा कणात
तो सुगंध दरवळ्तो मनात
प्रेम सरी बरसतात भर उन्हात.
भिजतो ओला चिंब नाहि भिजत आशा
प्रेमाची कधीच नाही भागत त्रिशा
पाणावलेल्या डोळ्यांना दिसते एकच दिशा
या प्रेमवेड्या भावनांची असते एकच भाषा.
अंगावरति फुलतात रोमांचाने काटे
हळुवार स्पर्श तिचा चर आवाजाने वाटे
श्वासामध्ये श्वास गुंतला भल्या त्या पाहटे
हा ज्वाला रसरशीत कि शांत मिळतो तरी कोठे.
ये तो मिठित होउणी उनाड गार गार वारा
जसा कि प्रेमाच्या दावनिला गोड गोड चारा
तो नाजुक थेंब टपकता कोसळली क्षणात गारा
वृक्षाच्या चांदणीचाच शोभे तो जोडीदार तारा.
खंत आहे त्या पडणारया एका पावसाची
आठवण होउणी पडतो त्या एकाच दिवसाची
रंगा मध्ये रंग मिसळ्तो उधळण होता थेंबांची
मना मनामध्ये स्फुर्ती भरली एक होणारया दोन जिवांची.

