STORYMIRROR

Mahesh Shinde

Romance

3  

Mahesh Shinde

Romance

स्वप्न परी तिची कहानी खरी

स्वप्न परी तिची कहानी खरी

1 min
192

उडालो होतो गगनात मी 

तारे तारंकाच्या अंगणात मी.


एक परी हळुवार जवळ आली

माझ्या मनात तिची भुरळ पडली.


घेतला तिने माझा हातात हात

फुलांचा पाऊस पडला हदयात.


मी सांगू लागलो माझी कहाणी

वाटू लागले जगणे मी राजा ती राणी.


ती म्हणाली तुम्ही असे कसे कवी

प्रेम भाषा कधी तरी करा बात नवी.


आम्ही असतो सर्व कवींच्या कवितेत खूप सुरेख

ना बघण्यास मिळते सासर ना माहेर आम्ही तर फक्त लेख.


आज घेतले तुम्ही मजला आहे स्वप्नात कवेत

आमुचे गुण तुम्हीच तर खरे आज सांगावेत.


मी म्हणालो सौंदर्य तुमचे बहुत खूप

जन्म नाही तुमचा भूलोकामध्ये हाचं गुण कुरूप


तुम्ही सौंदर्य तारका प्रत्येक कवीच्या येता चार ओळी होऊन

घेता नाही येत तुम्हा या रूपाचा आस्वाद मनी राहता होळी होऊन


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance