स्वप्नात प्रेम झाले मनाला
स्वप्नात प्रेम झाले मनाला
स्वप्नी एक गोड गोजीरा मुकडा आला
हळुवार स्मित हास्य करुनी गेला
तिला पाहता काळजाचा तुकडा हसला
माझ्या हृदयाचा भाग मला लाजला..
प्रेमाने विचारले मीचं मला
काय हवं विचारले सांग म्हणालो मनाला.
मन म्हणाले कमीत कमी तिला बोलायचं होतं
नावं ,पत्ता आणि गावं विचारायचं होतं.
तुला आवडली नाही किमान मला सांगायचं होतं
तू माणूस आहे की भुतं.
तू ती आली की मला परत सांग
घालविला चांस तुझ्या नानाची टांग.
तू आता परत एकदा झोप
तीच्या वेणीत घालायचं आहे गुलाबी रोपं.
तू आता माझ्या मध्ये पडायचं नाही
तू माझ्या पासूनी काही दडवायचं नाही.
मी सुखलो तिला पाहण्यासाठी
का तू तुझी चूक मान्य करतं नाही.
मी म्हणालो हे मना आता मला माफ कर
तू काळीज आणि हदयाचा निघाला बाप बरं.

