तिचा सहवास
तिचा सहवास
नाही ती जवळ तरी
होतो मला आभास
वाटतं मनाला अस
आहे ती आसपास
होतीस जेव्हा तू
सुंदर होता माझा प्रवास
गेलीस तू जेव्हा
राहिला फक्त तुझा आभास
थेंब पडता पावसाचे
आठवणीत तुझ्या रमतो
तुझ्या माझ्या एकांताचे क्षण
स्मरत हळूच गालात हसतो
असतेस जवळ तू जेव्हा
वेळ हा थांबावा
बोलता याव मला मनातल
आणि कस्तुरीचा गंध बहरावा
एकत्र एका छत्रीतून
पुन्हा आपला प्रवास व्हावा
खुप झाला दुरावा
जवळ येण्याचा बहाणा मिळावा
तुझ्या माझ्या नावेला
एक किनारा मिळावा
विरुद्ध झालेल्या आपल्या वाटांचा
पुन्हा एक संगम व्हावा
खडतर प्रेमाच्या परीक्षेचा
काळ हा अंत व्हावा
आयुष्याच्या वाटेवर
पुन्हा तुझा सहवास मिळावा

