नजरेस तू दिसावी
नजरेस तू दिसावी
आस तुझ्या येण्याची
मन लावून बसले
जसे रातराणी बहरण्यास
निशाची वाट बघत असे
गालात कळी खुलता
मन माझे बावरते
फुलपाखरु बनून
राणा वनात हिंडते
पाहता तुला मन
माझे हरपून जाते
मनात असलेले प्रेम
डोळ्यात दिसून येते
कट्यार तुझ्या डोळ्यांनी
पुन्हा घायाळ व्हावं
तुझ्यामागे चालत चालत
दुसर्याच जगात जाव
निशा काळी निजताना
सोबत तु असावी
पापणी उघडता प्रभाते
नजरेस तू दिसावी

