नयन तीचे छेडी मला
नयन तीचे छेडी मला
भेट होती पहिली अन, तू समोर आली
आकाशातून जणू अप्सरा चालुन आली,
नजर भिडली जेव्हा मनी तुफान आले
तुझ्या नावाचे वादळ काळजात घर करून गेले,
नजरे नजरेस इशारे किती केलेस
भोळ्या या मनाला वेडे किती केलेस,
नजरेच्या इशार्याची भाषा मी शिकत आहे
चंद्राकडे पाहिले की तुझाच आभास होत आहे,
गोल मोठ्या डोळ्यामधे मन माझे रमले
रोखले स्वताला खुप पण मन माझे हरवले,
शोधत होतो मी सर्व जगात
शेवटी पाहिले तर तुझ्याजवळ गवसले,
स्मितहास्य करून जेव्हा नजर फिरवली माझ्यावर
पाहत होतीस ना चिडलोका मी तुझ्यावर,
तुझे हे खेळ मी जाणुन आहे
जोडीदार पारखण्याचा हा एक प्रयत्न आहे,
दुर जाउन खुप काळ
परिक्षा माझी बघतेस,
अन आलीस समोर की
नजरेने घायाळ करतेस,
मनी कोण वसे माझ्या
जाणुन घ्यायला तुझी रुची आहे,
उत्तर तुला मी दिले नाही
डोळ्यात तुझ्या रुसवा मी पाहु शकत आहे
मनी साचलेला कल्लोळ
कधी करशील बाजुला
मीच तुझी प्रेयसी आहे का?
एकदा विचारुन तर बघ मला

