STORYMIRROR

Aakash Salunkhe

Tragedy

3  

Aakash Salunkhe

Tragedy

तू परत येऊ नकोस

तू परत येऊ नकोस

1 min
345

तुटलेल्या मनाला पुन्हा आशा नको उद्याची

आत्ता असह्य यातना पुन्हा दुर जाण्याची

टाके सहुन हृदयाला सावरतो आहे

आत्ता मी माझ्या मनाला आवरतो आहे

जोडल्या मनाला पुन्हा तोडायला येऊ नकोस 


विरहाने तुझ्या प्रेमावरून माझा विश्वास उडाला 

आत्ता कुठे माझा स्वाभिमान परत आला

विरले रंग माझ्या आयुष्यात तुझ्या प्रेमाचे 

विसरत आहे रस्ते तुझ्याकडे जाण्याचे

तुझ्या आवडी अजुनही स्मरतो आहे

पण हृदयाचे तुकडे केल्याबद्दल तुला

क्षमा करण्यास हरतो आहे 


आत्ता साथ नको तुझी 

बस्स राम राम हवा 

तू परत येणार नाहीस 

एवढा एकच वादा तुझ्याकडून हवा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy