निसर्ग नटलेला
निसर्ग नटलेला
निसर्ग नटलेला
खळखळ नदीनाल्यांनी
हिरव्या तृणांनी
सळसळणाऱ्या पानांनी
नटलेले डोंगर
शालू हिरवा पाघंरती
अवती भवती
फुले सप्तरंगी फुलती
सहवास फुलांचा
मला हवाहवासा वाटे
मनी हर्ष दाटे
जणू विठू माऊली भेटे
निसर्गाची किमया
नंदनवन करी धरा
आनंदाचा झरा
वाहतो उत्साहाचा वारा

