आले आभाळ भरून💧🦚💧🦚💧🦚💧
आले आभाळ भरून💧🦚💧🦚💧🦚💧
1 min
127
आले आभाळ भरून
ढग ढोल वाजवती
तरु सनई सुरात
वाऱ्यावर लहरती
मेघ दाटले आकाशी
लागे नाचाया मयूर
गर्द झाडीतून येई
कोकिळेचे गोड सूर
वीज चमकून सांगे
येती सरीभेटावया
भेगाळल्या धरित्रीच्या
जखमेस मिटवया
बरसला मेघराजा
जीवसृष्टी झाली शांत
आता जगाचा पोशिंदा
करी पेरणी निवांत
पावसाचा समभाव
माणसाच्या अंगी यावा
द्वेष कलह मिटून
आनंदीआनंद व्हावा
