पावसाचा आक्रोश
पावसाचा आक्रोश
सतत धार पावसाने
तर कहरच केला,
रात्रंदिवस धो धो
पडतच राहिला
ढगफुटी होऊन
पाऊस जबरदस्त
डोंगर उखडून झाली
गावचं जमीनदोस्त
पावसाच्या प्रकोपाने
घर मजले गेले बुडून
काडी काडी जमवलेला
संसार गेला पाण्यात सडून
संपर्क तुटले आता
खायला प्यायला नाही
चिखलाचा राडा झालायं
देवा आता करायचं काय
निसर्गाचा कोप होतोय
याला जबाबदार कोण
आपलं गणित चुकतंय का
जाणून घ्यायचा आलाय क्षण

