जोडी तुझी माझी
जोडी तुझी माझी
1 min
222
आवड होती खूपच पण
वेळच मिळायचा नाही
आलीस तू हातात कि
काही तरी लिहीत राही
चिमणी पाखरं उडून गेली
आठवणीने व्याकुळ होई
अशावेळी जवळची तू
म्हणून तुझी आठवणी येई
तुझी माझी जोडी जमली
केली सुरुवात लिहायला
आता नाही वेळ मिळत
टीव्ही सिरीयल पहायला
तुझ्यामुळे कवयित्रीचा
मान मला मिळाला
माझ्या मधला नवीन
गुण आज मला कळाला
वाद-विवाद दुःखाचे क्षण
लेखणी मुळेच विसरते
तुझ्या माझ्यासाठी साथीने
काव्यमय आनंद पसरते
