माणुसकी
माणुसकी
1 min
330
माणुसकीची परीक्षा
जर पहायची असेल
तर संकट काळात
नक्कीच ती दिसेल
कोरोनाच्या काळात
खरा देव जागा झाला
प्रशासन वैद्यकीयांच्या
सेवेने माणूस वाचविला
माणूस स्वार्थी झाला तरी
माणुसकी शिल्लक आहे
दुष्काळ असो किंवा पूर
मदतीचा हात देत राहे
अपेक्षा , स्वार्थ सोडल्यावर
माणुसकी जन्मास येते
अविश्वास हव्यासापोटी
माणुसकी लयाला जाते
प्रतिष्ठा धनदौलती साठी
माणुसकीचा अस्त होतो
वेळ प्रसंगी संकटकाळी
माणूसच माणसाच्या कामी येतो
