प्रेम
प्रेम
1 min
189
राधा कृष्णाचे प्रेम
साऱ्या जगाने पाहिलं
राधेने आपलं जीवन
कृष्णासाठी वाहिलं
खऱ्याखुऱ्या प्रेमाला
बोलायची गरज नसते
ह्रदयाशी ह्रदय सतत
मनाने भेटत असते
नदीला ओढ सागराची
म्हणून भेटायला जाते
आभाळ भूमीला भेटायला
पर्जन्याचें रूपाने येते
प्रेम प्रियकर प्रेयसी
यांच्यामध्येचं नसते
प्रेमाची व्याख्या सर्वचं
नात्यांना लागू असते
आई मुलांचं प्रेम असतं
बहिण भावाचं प्रेम असतं
मित्र मैत्रिणींचं प्रेम असतं
आजी नातवंडाचं प्रेम असतं
प्रेम निस्वार्थी असावं
प्रेम निसर्गावर करावं
प्रेमात किर्तीरूपी उरावं
प्रेमाने जगावं आणि जगू द्यावं
