शिदोरी
शिदोरी
1 min
216
आईच्या संस्काराची शिदोरी
जगण्याखस पुरे जन्मभरी
शाळेतील ज्ञानाची शिदोरी
जीवन प्रकाशमय करी
गोड अशा मैत्रीची शिदोरी
नाती साथ देती जन्मभरी
शिदोरी धार्मिक साहित्याची
संस्कार संस्कृती जपण्याची
शिदोरी असे आठवणींची
संकटाला सामोरे जाण्याची
सुखमय आनंदी क्षणांची
खचलेल्या उभे करण्याची
शिदोरी असावी कर्तृत्वाची
विखुरली नाती जपण्याची
एकमेका साह्य करण्याची
एक तीळ वाटून खाण्याची
