प्रेमाचा पाऊस
प्रेमाचा पाऊस
1 min
242
प्रेमाच्या पावसात
नाचे मनातला मोर
पहिल्या पावसाची
वाट पाहतो चकोर
काळोखलेल्या मेघांनी
हृदयातील प्रेम दाटते
प्रेमाच्या पाऊसाने
मनी प्रसन्न वाटते
ओसंडणाऱ्या पावसाने
मनातील दुःख वाहते
चिंब होऊन भावना
मन आनंदी राहते
पूर येऊन अश्रूंचा
निराशा वाहून जाते
प्रेमाच्या मृदगंधाने
हृदय भरून येते
