बालकविता - पाऊस
बालकविता - पाऊस
1 min
86
ढग आले आकाशी
जोरात सुटला वारा
गडगडाट झाला
पडू लागल्या गारा
ओली माती झाली कि
कोटी आता बनवूया
गाऱ्या भिंगोऱ्या खेळूया
पाऊस गारा झेलूया
पाऊस आला धो धो
पाणी लागले वाहू
कागदी होडी करून
पाण्यात सोडून पाहू
पावसात भिजल्यावर
आई रागावते फार
चिखलाने भरला तर
उघडत नाही दार
संवगड्या सोबत आई
मला पावसात जाऊ दे
मस्त मजेत भिजून
मला ओलंचिंब होऊ दे
