आई
आई
1 min
226
चंदनाच्या खोडाप्रमाणे
कायम झिजत राही..
लेकरांच्या सुखासाठी
जन्म आपुला वाही...
ओतप्रोत प्रेमाचा आहे
हा एकमेव असा झरा
तापलेल्या उन्हात ही
मंद सुटलेला गार वारा
वाढविलेस तू प्रेमाने
दिली संस्काराची ठेव
तुझ्यातच पाहतेय मी
साऱ्या दुनियेतले देव
मनाच्या गाभाऱ्यात
सदा तूच असावी...
कुठेही पाहिले तिथे
तूच मला दिसावी...
आईच्या मायेला
कुठेच नाही जोड
ममतेने दरवळते
हे चंदनाचे खोड
