येरे घना येरे घना
येरे घना येरे घना
ढगांच्या वाजुदे ढोलताशा
वाऱ्याची वाजुदे सनई
सरींच्या तालावर होऊदे
विद्युतलतेची रोषणाई l
पडूदे एकात्मतेचा पाऊस
वाहुदे सहकार्याचा वारा
चमकूदे सुविचाराची वीज
पडुदे आनंदाच्या गारा l
वाहुन जाऊदे दुःखाचे डोंगर
सरींनी करुदे आनंदाचं शिंपण
विजेने चमकूदे सत्याचा प्रकाश
स्वार्थ स्वैराचारा घालूदे लिंपण l
बळीराजाने केली मशागत शेतीची
ओसंडून ये आता धरणीवरती
कष्ट कितीही होवो आम्हा
पिकवू सकलांना माणिक मोती l
तापलेल्या धरतीला मिळूदे गारवा
वेळ नको लावू आता बरसायला
मेघराज आला वाजत गाजत
आता पावसात भिजायचं मला l
अखंड सृष्टीला मिळते
तुझ्या येण्याने जीवदान
वृक्षारोपण आणि संगोपन
करण्याची घेऊ आण l
