स्केच
स्केच
फूल तुझे केश सांभाळीत गेले.
त्या चित्राला फूल न्याहाळीत गेले.
कागदाला लेखणी ती घासताना.
ते शिसेही आसवं जाळीत गेले.
वासुदेव कागदावं मोरकुंचे-
फेरुनी, त्याची चुरी गाळीत गेले.
ओठ ते का गं गुलाबी दाबले तू.
ओठ रेखांचे ठसे ढाळीत गेले.
पाहिले, त्या तू चित्राला, त्याच वेळी .
लोक जेव्हा ती वही चाळीत गेले.

